पाहा, रिंकू राजगुरुचा असा हा 100% मेक-अप!

पाहा, रिंकू राजगुरुचा असा हा 100% मेक-अप!

मुंबई : 'आर्ची' हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. 'सैराट' या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ही रिंकू चित्रपटातून झळकली. काही दिवासांपूर्वी तीने 'धडक' फेम जान्हवी कपूरची भेट घेतली आणि चर्चेचा विषय ठरली. रिंकूचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

#redcarpetlook#zee talkies#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on 

रिंकूच्या आगामी चित्रपटाचं नाव 'मेकअप' असून त्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नेटकऱ्य़ांमध्ये या टिझरची चर्चा असून तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. रिंकूसोबत य़ा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता चिन्मय उदगीकर झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रिंकू दोन अगदी वेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. साध्या मुलीमधला तिचा रोल आणि मग मॉर्डन रिंकूच्या लुकने सिनेमामध्ये ट्विस्ट आणला आहे. हा चित्रपट कॉमेडीची मेजवानी असणार आहे.  घरच्यांसमोर ती संस्कारी, सोज्वळ, लाजाळू असते तर घराबाहेर ती तेवढीच निर्भीड, बिनधास्त आणि स्वतःच्या मनाला वाटेल तेच करणारी असते. टीझरमध्ये सुरुवातीला तिला पाहण्यासाठी मुलगा येतानाचा सीन दाखवण्यात आला आहे. यात ती १०० टक्के संस्कारी, १०० टक्के लाजाळू असल्याचं कौतुकाने सांगितलं जातं.

रिंकूची एक वेगळी झलक या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये इतर कलाकार कोण असणार आहेत आणि रिंकूचा 'मेकअप' कशासाठी आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ट्रेलरसाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Black and white

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on 

चित्रप़टाचं दिग्दर्शन आणि लेखन गणेश पंडीत यांनी केलं आहे. तर, दिपक मुकुट, हिरेन गडा, निरज बर्मन, अमित सिंग आणि बी. राव यांनी केलं आहे. चिन्मय आणि रिंकू ही जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे. सैराटशिवाय रिंकू मानसू मल्लिगे, नूर जहान, कागर या चित्रपटातून झळकली आहे. शिवाय ती ताहिर शब्बीरच्या वेब सिरिजमध्येही दिसणार आहे. '100' असं या सिरिजचं नाव असून ती हॉटस्टारवर रिलिज होणार आहे. 

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 #sairatmetdhadak.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on 

काही दिवसांपूर्वी रिंकूने जान्हवी कपूरसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर या दोघी एकत्र काम करताना दिसणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. 

Web Title: Rinku rajguru upcoming movie teaser released

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com